निवडणूक निकाल 23 तारखेला आल्यावर भाजपच्या पायाखालची जमीन सरकेल; RJD खासदाराचा मोठा दावा

झारखंड आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. तसेच काही राज्यात पोटनिवडणुका होत आहेत. 20 तारखेला मतदान होत असून 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. या निवडणूक निकालांनंतर भाजपच्या पायाखालची जमीन सरकणार आहे, असा मोठा दावा आरजेडीचे खासदार मनोज कुमार झा यांनी केला आहे. तसेच त्यांनी झारखंडमधील निवडणूक निकालांबाबतही प्रतिक्रिया दिली आहे.

झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांना अटक करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यानंतर राज्यात काही योजना राबवत वातावरण एकतर्फी करण्यात आले आहे. मात्र, त्याचा जनतेवर काहीही परिणाम होणार नाही. भाजपवाले तोडा आणि फोडा असे राजकारण करत आहे. फक्त समाजासमाजात विष पेरणे आणि द्वेष पसरवणे हेच भाजपचे काम आहे. मात्र, आता या विषवृक्ष नष्ट करण्यासाठी जनतेने उपाय शोधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. मोदी यांनी आपल्या या उद्योगपती मित्रासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यांचे हे संबंध कोणापासूनही लपलेले नाहीत. त्यामुळे याबाबत अधिक बोलण्याची गरज नाही. भाजपचे द्वेषाचे आणि तोडा, फोडा, झोडाच्या राजकारणाला आता जनताच उत्तर देणार आहे. 20 तारखेला मतदान झाल्यावर 23 तारखेला निकाल येतील, तेव्हा भाजपच्या पायाखालची जमीन सरकेल, असा दावाही त्यांनी केला. बिहारमधील पोटनिवडणुका आणि झारखंडमध्येही असेच चित्र दिसून येईल, असेही झा म्हणाले.