तर तुम्हीच सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या; लोसकभा अध्यक्षांनी केंद्रीय मंत्र्याना सभागृहात झापलं

सर्वपक्षीय बैठकीत संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्यावर एकमत झाले. त्याप्रमाणे मंगळवारी संसदेचे कामकाज सुरळीत झाले. मात्र, मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांना चांगलेच झापले. अर्जुन राम मेघवाल शून्य प्रहर सुरू होण्यापूर्वी अजेंड्यातील सर्व मंत्र्यांच्या नावाची कागदपत्रे सादर करत होते. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप घेत त्यांना चांगलेच झापले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संताप व्यक्त केला आणि ते म्हणाले, सदनाच्या पटलावर ज्या मंत्र्याचे नाव आले आहे, तोच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपस्थित राहावा यासाठी संसदीय कार्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत. अन्यथा तुम्हीच सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मेघवाल यांना झापल्यानंतर लोकसभेत जोरदार हशा पिकला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सभागृहातील प्रश्नोत्तराचा तास दुपारी 12 वाजता संपल्यानंतर, विषयपत्रिकेत नमूद केलेली कागदपत्रे संबंधित मंत्र्यांनी सभागृहाच्या टेबलावर ठेवावी. मात्र, जेव्हा संबिधित मंत्री सभागृहात उपस्थित नसतो तेव्हा संसदीय कामकाज राज्यमंत्री हा दस्तऐवज सादर करतात. यावर मोन बिर्ला यांनी आक्षेप घेत पटलावर नाव असेल त्या मंत्र्यांने प्रश्नांची उत्तर देण्यासाठी सभागृहात उपस्थित राहावे, असे म्हटले आहे.