महाराष्ट्रातील विधानसभेचे निकाल संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. आता याबाबत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी सनसनाटी दावा केला आहे. महाराष्ट्र आणि हरयाणात भाजपने षडयंत्र रचत विजय मिळवला आहे. दिल्लीतही भाजपचे असे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही भाजपचे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही त्यांचे सर्व डाव हाणून पाडू, असा निर्धार अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.
दिल्ली विधानसभा निवडणूक पुढील वर्षात होणार आहे. निवडणुकीला तीन महिममे असल्याने आतापासून रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यात अरविंद कजेरीवाल यांनी सनसनाटी दावा केला आहे. याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात जनतेची मते कापण्याचा प्रयत्न करताना भाजपला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. हजारो मतदारांची मते कापण्यासाठी भाजपने अर्ज दाखल केला आहे. लवकरच यावर मोठा गौप्यस्फोट करणार आहे. या लोकांनी हरयाणा आणि महाराष्ट्राची निवडऊक अशीच जिंकली का? दिल्लीतही त्यांचे तेच प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही तो हाणून पाडू. त्यांचा डाव आपण दिल्लीत यशस्वी होऊ देणार नाही,असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दिल्ली में बीजेपी बड़े स्तर पर लोगों के वोट कटवाने की कोशिश करते रंगे हाथों पकड़ी गई। बीजेपी ने हज़ारों वोटर्स के वोट कटवाने के लिए अर्ज़ी डाली। जल्द इस पर बहुत बड़ा खुलासा करूँगा।
क्या ये लोग हरियाणा और महाराष्ट्र का भी चुनाव इसी तरह जीते?
बीजेपी वालों, दिल्ली में तुम्हारा…
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 4, 2024
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने अनपेक्षित विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या नेतृत्वाखाली भाजपने काँग्रेसच्या बाजूने वातावरण असतानाही, मोठा विजय मिळवला. तसेच, महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या बाजूने असलेला जनमत असतानाही भाजपला विजय मिळल्याची चर्चा होत आहे. विरोधी पक्षांनी ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. याबाबत आता अरविंद केजरीवाल यांनी सनसनाटी दावा केला आहे.