नरेंद्र मोदीजी, आज 2023 चा शेवटचा दिवस आहे. तुम्ही म्हणाला होतात की, 2022 पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणार, प्रत्येकाला घर आणि अहोरात्र वीजपुरवठा देणार, अर्थव्यवस्था 5 ट्रीलियन डॉलरची करणार… हे सर्व घडलंच नाही, असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तोफ डागली.
खरगे यांनी मोदी सरकारने 2022 पासून दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख करत टीकास्र सोडले. भाजप के झूठ है सबसे मजबूत… हे आता सगळय़ाच देशवासीयांना कळून चुकले आहे, अशी टीका खरगे यांनी एक्सवरून केली आहे.
अर्थव्यवस्थेची हाताळणी आणि शेतकऱ्यांविषयीची धोरणे यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीही 2021 ची दशवार्षिक जनगणना अद्याप न केल्याबद्दल सरकारला धारेवर धरले आहे. या अवास्तव विलंबामुळे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे.