देशभरात UPI सेवा डाऊन, पैसे पाठवण्यात आणि प्राप्त करण्यात वापरकर्त्यांना अडचणी

देशातील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा सर्व्हर बुधवारी डाउन झाला आहे. यामुळे वापरकर्त्यांना फोनपे, गुगल पे आणि इतर पेमेंट अ‍ॅप्सवरून पैसे पाठवण्यात आणि प्राप्त करण्यात समस्या येत आहेत. वापरकर्त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत माहिती दिली.

यूपीआय सर्व्हर डाऊन झाल्याने वापरकर्त्यांना अनेक अडचणी येत आहेत. दैनंदिन व्यवहारांवर याचा परिणाम होत आहे. ऑनलाइन शॉपिंग आणि अ‍ॅप्सवर पेमेंट फेल झाल्याच्या तक्रारी वापरकर्त्यांनी केल्या आहेत.