शेतकरी नेते राकेश टिकैत यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; आता आरपारची लढाई, टिकैत यांचा इशारा

उत्तर प्रदेश पोलिसांनी शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेत टिकैत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अलिगढमधून ताब्यात घेतले आहे. आपल्या अनेक मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी आंदोलनादरम्या टिकैत यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच याबाबत राकेश टिकैत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, ते आपल्याला कोठे नेणार आहेत, याची माहिती नाही. सरकारच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्यांनी तोडगा काढला नाही तर आम्ही येथून लखनऊपर्यंत ट्रॅक्टर रॅली काढणर आहोत. आम्ही आज संध्याकाळपर्यंत सरकारच्या उत्तराची वाट पाहणार आहोत. आता आरपारची लढाई होणार आहे. हे सरकार शेतकरी, सर्वसामान्य जनता, मजूर, गरीब यांचा आवाज दाबणारे हे सरकार आहे. आपल्याला ताब्यात घेत त्यांनी त्यांचा पहिला डाव टाकला आहे. आता आम्ही संध्याकाळपर्यंत त्यांच्या उत्तराची वाट बघणार आहोत. त्यानंतर आम्ही आमची पुढील रणनीती आणि आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहोत. आता ही आरपारची लढाई आहे, असेही राकेश टिकैत यांनी सांगितले.