
बिहारच्या नौगछिया येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या भाच्यांमध्ये वाद झाल्याने गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर नित्यानंद यांच्या बहिणीला गंभीर दुखापत झाली. जयजित यादव आणि विश्वजित यादव या दोन भाच्यांमध्ये वाद झाला. गोळी लागून विश्वजित यादव याचा मृत्यू झाला तर दुसरा भाचा गंभीर आहे. येथील जगतपूर गावात ही घटना घडली. शुल्लक कारणावरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की गोळीबारापर्यंत पोहोचला. गोळी लागताच जखमी भावाने बंदूक हिसकावून प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि दुसऱया भावाचा जीव घेतला. गोळीबारावेळी मध्यस्थीसाठी गेलेल्या नित्यानंद राय यांची बहीण हिना देवी यांनाही गोळी लागली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.