स्टिअरिंगमध्ये बिघाड, अनियंत्रित स्कूलबस कालव्यात पडली, आठ विद्यार्थी जखमी

स्टिअरिंगमध्ये बिघाड झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कूलबस कालव्यात कोसळली. या अपघातात बसमधील आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. बसचालक आणि महिला अटेंडंटही जखम झाले. हरियाणातील कैथल जिल्ह्यात ही घटना घडली.

खासगी शाळेची बस सोमवारी सकाळी मुलांना शाळेत घेऊन जात होती. यावेळी बसच्या स्टिअरिंगमध्ये बिघाड झाल्याने बस अनियंत्रित झाल्याने बस कालव्यात पडली. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बसमधून बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताबाबत पुढील चौकशी सुरू आहे.