![mp accident](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/mp-accident-696x447.jpg)
महाकुंभहून परतत असताना ट्रॅव्हलरची ट्रकला धडक बसल्याने भीषण अपघातात सात भाविकांचा मृत्यू झाला. अपघातात अनेक जण जखमी झाले. मध्य प्रदेशातील जबलपूरधील सिहोराजवळ हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
आंध्र प्रदेशातील भाविक प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी गेले होते. तेथून परतत असताना ट्रॅव्हलर, सिमेंट घेऊन जाणारा ट्रक आणि एका कारची धडक झाली. यात ट्रॅव्हलरमधील सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना सिहोरा सरकारी रुग्णालय आणि जबलपूरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस रुग्णालयात हलवण्यात आले आहे.