पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते सत्येन चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते सत्येन चौधरी यांची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. बहारामपूरच्या चलटियामध्ये रविवारी दुपारी काही जण बाईकवरून आले आणि त्यांनी चौधरी यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर सत्येन चौधरी यांना मुर्शिदाबादच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. तेथे तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

एकेकाळी सत्येन चौधरी हे काँग्रेसनेते अधीर रंजन चौधरी यांच्या मर्जीतले नेते होते. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, सध्या सत्येन हे सत्ताधारी पक्षापासून लांब होते. मुर्शिदाबादमध्ये रविवारी अज्ञात हल्लेखोरांनी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. सत्येन यांना तातडीने मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.