
गुजरातच्या बनासकांठा जिह्यातील एका 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सात नराधम तब्बल 16 महिने वारंवार बलात्कार करत असल्याचे उघडकीस आले आहे. पीडितेचे नग्न व्हिडीओ काढून आरोपी तिला ब्लॅकमेल करत होते.
पालनपूर येथील तरुणीशी 2023 मध्ये आरोपींपैकी एकाने इन्स्टाग्रामवरून मैत्री करत तिला एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी बोलावले. आरोपीने जाणीवपूर्वक तिच्या कपड्यांवर अन्न सांडले आणि ते साफ करण्याच्या बहाण्याने एका खोलीत नेले आणि ती बाथरूममध्ये कपडे बदलत असताना विशाल चौधरी नावाचा आरोपी आत शिरला आणि तिचे व्हिडीओ काढून इन्स्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. शारीरिक संबंध ठेवण्यास तिला भाग पाडले गेल्याचा आरोपही तिने केला आहे.