स्कूलबसमध्ये जागेचा वाद टोकाला गेला, दोन विद्यार्थ्यांमध्ये मारहाण; एकाचा मृत्यू

स्कूलबसमध्ये जागेवरून झालेला वाद टोकाला गेल्याने दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचाा मृत्यू झाल्याची घटना तामिळनाडूत घडली. सलेम जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

पीडित आणि आरोपी शाळकरी मुलांमध्ये स्कूलबसमध्ये जागेवरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला आणि दोघांमध्ये मारामारी झाली. यानंतर एका विद्यार्थ्याने दुसऱ्याला जोरात धक्का दिला. यात त्याला गंभीर जखम झाली.

जखमी विद्यार्थ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. आरोपी मुलाला लवकरच बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येईल.