
राजस्थानमधील अलवरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला केला. नव्या गुप्ता (18) असे या तरुणीचे नाव आहे. फिजिओथेरपीची विद्यार्थिनी तिच्या घराजवळ मोबाईल फोनवर बोलत होती. त्याचवेळी कुत्र्यांनी अचानक तिच्यावर हल्ला केला. तिला रस्त्यावर पाडले आणि तिच्या शरीरावर विविध ठिकाणी चावा घेतला. तिच्या हातावर, पायावर आणि शरीराच्या इतर भागांवर कुत्र्याच्या नखांचे आणि दातांचे निशाण होते. या हल्ल्यानंतर तिला घराबाहेर पडायलाही भीती वाटते, असे नव्याच्या वडिलांनी सांगितले.