नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, महाकुंभाला जाणाऱ्या लोकांची गर्दी झाली अनियंत्रित

नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या 14, 15 आणि 16 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे, असं वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिलं आहे. महाकुंभाला जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती, असे सांगण्यात येत आहे. मोठी गर्दी झाल्याने येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

याबाबत माहिती देताना रेल्वेचे पोलिस उपायुक्त केपीएस मल्होत्रा ​​म्हणाले की, ”शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने 15 जण जखमी झाले.” ते म्हणाले की, ”प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर उभी होती, त्यावेळीप्लॅटफॉर्मवर बरेच लोक उपस्थित होते. दरम्यान, स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस गाड्या देखील उशिराने धावल्या आणि या गाड्यांमधील प्रवासी देखील प्लॅटफॉर्म क्रमांक 12, 13 आणि 14 वर उपस्थित होते. दरम्यान, सुमारे 1500 जनरल तिकिटेही विकली गेली होती आणि त्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळील एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.”