DMK Drops Rupee Symbol – द्रमुकच्याच नेत्याच्या मुलाने डिझाइन केलं होतं ‘₹’ चिन्ह, वाचा सविस्तर…

तामीळनाडूत हिंदीविरोधातला वाद गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड वाढताना दिसत आहे. यातच येथील द्रमुक सरकारने मोठा निर्णय घेत राज्याच्या अर्थसंकल्पातून ‘₹’ चे चिन्ह बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता तामिळनाडू सरकारने ‘₹’ या चिन्हाऐवजी तामिळ लिपीलील ‘ரூ’ या चिन्हाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. तमिळ भाषेत ‘ரூ’ या तमिळ अक्षराचा अर्थ रुपया असा होतो. दरम्यान, तामिळनाडू सरकारने बदललेलं ‘₹’ हे चिन्ह एका तमिळ व्यक्तीनेच डिझाइन केलं आहे. उदयकुमार धर्मलिंगम (Udayakumar Dharmalingam) यांनी हे चिन्ह डिझाइन केलं आहे. ज्यांचे वडील हे द्रमुक नेते होते.

कोण आहेत उदयकुमार धर्मलिंगम?

उदयकुमार धर्मलिंगम हे एक शिक्षणतज्ज्ञ आणि डिझायनर आहेत. ज्यांनी हिंदुस्थानी रुपया चिन्ह ‘₹ डिझाइन केलं. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1978 रोजी तामिळनाडूतील कल्लाकुरिची येथे झाला. ते चेन्नई, तामिळनाडू येथील रहिवासी आहेत आणि आयआयटी गुवाहाटी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. उदयकुमार धर्मलिंगम यांचे वडील एन धर्मलिंगम हे द्रमुकचे माजी आमदार आहेत. उदयकुमार धर्मलिंगम हे देशातील एक प्रसिद्ध डिझायनर आहेत. रुपयाच्या डिझाइनसाठी केंद्र सरकारने एक स्पर्धा आयोजित केली होती. जी उदयकुमार यांनी जिंकली होती.

तामिळनाडू सरकारचा केंद्राला दणका, स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पातून ‘₹’ चिन्ह वगळलं