
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांचे प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. युपीएससीने तक्रार दिल्यानंतर खेडकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या प्रकरणामुळे बोगस प्रमाणपत्रे देत सरकारी नोकऱ्या मिळवण्याचा मुद्दाही चर्चेत आला आहे. तसेच NEET सारख्या महत्त्वाच्या परीक्षातील पेपरफुटीचे प्रकरण ही गाजत होते. देशातील तरुणांच्या आयुष्याशी आणि त्यांच्या भवितव्याशी संबंधित हा प्रश्न आहे. युपीएससीसारख्या परीक्षेत पारदर्शकता असावी, असे मत व्यक्त करत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी अनेक सवाल उपस्थित करत मोदी सरकारला घेरले आहे.
स्पर्धा परिक्षांच्या पेपरफुटीवरुन किंवा चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करुन सरकारी नोकरी मिळवल्याची अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, असाच प्रकार थेट युपीएससीसारख्या केंद्रीय आयोगाच्या परीक्षेत घडला आहे. बोगस प्रमाणपत्र सादर करुन आयएएस पद मिळवल्याचा प्रकार पूजा खेडकर प्रकरणाने उघडकीस आला आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. युपीएससी परीक्षेत बोगस प्रमाणपत्रे दिल्याचे उघड झाल्यानंतर प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारला सवाल केले आहेत. प्रियांका गांधी यांनीही ट्विट करुन सरकारला प्रश्न विचारले आहेत.
UPSC देश की सबसे नामी परीक्षा है और उससे निकले लोग शासन व्यवस्था के सबसे महत्वपूर्ण स्तम्भ होते हैं। देश के करोड़ों लोगों का भरोसा और हमारे रोजमर्रा के शासन-प्रशासन का कामकाज इस संस्था की पेशेवर प्रणाली से जुड़ा है।
मैंने खुद देखा है कि इस परीक्षा के लिए युवा कितनी मेहनत, आँखों…
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 20, 2024
युपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थी किती मेहनत घेतात, हे मी स्वत: पाहिलंय. ते तहानभूक विसरून अनेक तास अभ्यास करतात. त्यांचे स्वप्न हे पद मिळवणे हे असते. मात्र, बोगस प्रमाणपत्रांमुळे अयोग्य व्यक्ती स्वतःची वर्णी लावतात आणि या मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते. पूजा खेडकर यांच्यामुळे प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे काळे कारनामे आता उघड झाले आहेत. युपीएससी परीक्षेतही बोगसगिरी चालत असेल तर सर्वसामान्यांनी परीक्षा द्यायच्या की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
मी स्वत: युपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी दिवसरात्र एक करुन मेहनत घेताना, आपल्या भविष्याची स्वप्न रंगवताना पाहिले आहेत. त्यामुळे, युपीएससी परीक्षेतील घोटाळ्याचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. या प्रक्रियेतील एकही बोगसगिरी अनेक प्रश्न उपस्थित करते. लाखो युवकांचे स्वप्न आणि त्यांच्या विश्वासावर मोठा आघात करते. त्यामुळेच, जनता आणि युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
राजकीय हस्तक्षेपाने या उच्च पदावर नियुक्त झालेले याला जबाबदार आहेत का? तसे असेल तर त्यांच्यावर कारवाई कधी करणार, असा सवालही प्रियांका यांनी केला आहे. नकली प्रमाणपत्रामुळे एससी, एसटी, ओबीसी, विकलांग व ईडब्लूएस प्रवर्गातील उमेदवार त्याचा परिणाम होतो. त्यामुळे, हे प्रमाणपत्र तपासणी करणारी एखादी संस्था विकसित केली जाईल का? असा सवालही त्यांनी केला आहे.