ग्रेटर नोएडात एका केमिकल कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने कारखान्यातील कर्मचारी तात्काळ बाहेर पळाल्याने जीवितहानी टळली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 20 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आग लागल्यानंतर कारखान्यातून स्फोटाचे आवाजही येत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. तपासाअंती आगीचे कारण समोर येईल.
कारखान्याच्या आवारात 25 गुरे आगीत अडकली होती. बदलापूर पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने भिंत तोडून गुरांना सुरक्षित बाहेर काढले. आगीचे रौद्ररुप पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.