
लंडनहून मुंबईत येणाऱ्या व्हर्जिन अटलांटिक विमानाचे तुर्कीमधील दियारबाकिर विमानतळावर अचानक आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानात 200 हून अधिक भारतीय प्रवासी असून, गेल्या 15 तासांहून अधिक काळ विमानतळावर अडकले आहेत. एका प्रवाशाला पॅनिक अॅटॅक आल्याने विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याचे कळते.
आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर विमानातील प्रवाशांसाठी कोणताही पर्यायी व्यवस्था अद्याप करण्यात आली नाही. प्रवाशांनी उड्डाण अधिकाऱ्यांकडे याबाबत चिंता व्यक्त केली, मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अडकलेल्या प्रवाशांमध्ये आजारी नागरिक आणि लहान मुलांचा समावेश आहे.