
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील तीर्थंकर महावीर विद्यापीठात वीज कोसळून पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पावसापासून बचाव करण्यासाठी पाच विद्यार्थी गुरुवारी विद्यापीठाच्या आवारात एका झाडाखाली थांबले होते. यादरम्यान त्यांच्यावर वीज कोसळली. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंडमध्ये अवकाळी पावसाने हाहाःकार माजवला आहे. उत्तर प्रदेशात पावसामुळे आणि वीज कोसळल्याने किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंडमध्ये एकूण 47 जणांचा मृत्यू झाला.