लाल चंदनाच्या तस्करीचे रॅकेट उद्धवस्त करण्यास कर्नाटक पोलिसांना यश आले आहे. होस्कोटे तालुक्यातील तिरुमलशेट्टीहल्ली पोलिसांनी कट्टीगेनाहल्ली गावातून एक कोटी रुपयांचे लाल चंदन जप्त केले आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. जप्त केलेले लाल चंदन पुढील तपासासाठी आंध्र प्रदेश पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.
तस्करांनी नीलगिरीच्या जंगलात हे लाल चंदन लपवून ठेवले होते. पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लाल चंदनाचे 180 ओंढके हस्तगत केले. याची बाजारात किंमत एक कोटी रुपये आहे.
आंध्र प्रदेश पोलिसांनी तस्करांना अटक केली. तस्करांनी चौकशीत लाल चंदन कुठे ठेवले याची माहिती दिली. यानंतर आंध्र प्रदेश पोलिसांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक पोलिसांनी निलगिरीच्या जंगलात सर्च ऑपरेशन राबवत लाल चंदन जप्त केले, अशी माहिती बेंगळुरू ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दिली.