चीनमध्ये झपाट्याने HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण हिंदुस्थानात आढळला आहे. बंगळुरुमध्ये आठ महिन्यांच्या चिमुकलीला HMPV ची लागण झाली आहे. ही चाचणी आपल्या लॅबमध्ये झाली नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. एका खासगी रुग्णालयात ही तपासणी करून अहवाल देण्यात आला आहे. खासगी रुग्णालयाच्या अहवालावर शंका घेण्याचे कारण नाही, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
सामान्यतः HMPV फक्त लहान मुलांमध्ये आढळतो. सर्व फ्लू नमुन्यांपैकी 0.7 टक्के HMPV चे असतात. या विषाणूचा स्ट्रेनबाबत अद्याप कळले नाही.
विषाणूची लक्षणे काय आहेत?
ह्युमन मेटाप्युमोव्हायरस किंवा एचएमपीव्ही (HMPV) ची लक्षणे बहुतांश सर्दीच्या लक्षणांसारखीच असतात. खोकला किंवा घशात घरघर, सर्दी होते किंवा घसा खवखवतो. लहान मुले आणि वृद्धांमध्ये एचएमपीव्ही संसर्ग गंभीर असू शकतो. या विषाणूमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांमध्ये गंभीर आजार होऊ शकतो.