मद्यधुंद चालकाने चिमुकल्याला चिरडले, पळण्याच्या प्रयत्नात असताना कार उलटली; चौघे जखमी

मद्यधुंद चालकाने भरधाव कार एका घरात घुसवल्याने एका 5 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर पलायन करण्याच्या हेतून कार पळवत असतानाच कार उलटली. यात कारमधील चौघे जखमी झाले. चालक गंभीर जखमी झाला आहे. चिमुकल्याच्या नातेवाईकांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात भिलाड-नरोली रेल्वे क्रॉसिंगवर ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेतला. नंतर कारमधील सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलीस अधिक तपास करत आहेत.