सोन्या चांदीचे दर हे शेअर बाजार आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतात. शेअर बाजारात घरसण होत असताना सोन्या चांदीच्या दरात वाढ होत होती. आता शेअर बाजारात तेजी दिसत असताना सोन्याचांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. सोमवारी सोन्याच्या दरात एक हजाराची घट झाली आहे.
सराफ बाजारात गेल्या चार दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या सोने भावात सोमवारी (25 नोव्हेंबर) मोठी घसरण झाली. सोन्याचे भाव एक हजार 300 रुपयांनी कमी होऊन 77 हजार 600 रुपये प्रति 10 ग्रॅम या दरावर आले आहेत. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीदेखील एक हजार 200 रुपयांनी कमी होऊन 90 हजार 500 रुपये प्रति किलोवर आली आहे. ऐन लग्न सराईत सोने भावात मोठी घसरण झाल्याने सोने खरेदीसाठी ही सुवर्णसंधी आहे.
मध्यंतरी घसरण झालेल्या सोने भावात चार दिवसांपासून वाढ होत गेली. यामध्ये 21 नोव्हेंबर रोजी सोन्याचे दर एक हजार ३०० रुपयांनी कमी होऊन 77 हजार 600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले. चांदीचे भावही घसरले आहेत. आगामी काळात जागतिक अस्थिरता आणि शेअर बाजारातील घडामोडी याचा सोन्याच्या दरावर परिणाम होणार आहे. जागतिक अशांतता वाढल्यास सुरक्षित गुतंवणूक म्हणून अनेकजण सोने खरेदीकडे वळतील. त्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तसेच पुढील वर्षात सोने एका लाखावरील टप्पा गाठू शकतो, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.