![accident](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/08/shahapur-st-bus-accident-news-696x447.jpg)
हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाची मुलगी स्कूलबसमधून खाली उतरली आणि घराकडे चालली होती. इतक्यात बस चालकाने बॅक गियर टाकला आणि बसच्या चाकाखाली येऊन मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरू केली आहे.
हैदराबादमधील श्री चैतन्य स्कूलमध्ये शिकणारी चार वर्षाची ऋत्विका नेहमीप्रमाणे स्कूलबसमधून उतरली आणि घराकडे जात होती. ऋत्विका बसच्या मागच्या बाजूने घराकडे चालल्याचे चालकाने पाहिले नाही. ऋत्विका खाली उतरल्यानंतर बसचालकाने बॅक गियर टाकताच बसचे मागचे ऋत्विकाच्या अंगावर गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.