दहा वर्षांत देशावर विदेशी कर्ज 250 अब्ज डॉलर्सनी वाढले

देशावर गेल्या दहा वर्षांत विदेश कर्ज तब्बल 250 अब्ज डॉलर्सने वाढले आहे. लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. सप्टेंबर 2024च्या आकडेवारीनुसार देशावर सध्या 711.8 अब्ज अमेरिकन डॉलरचे कर्ज आहे. मार्च 2014मध्ये हे कर्ज 446.2 अब्ज अमेरिकन डॉलर होते. देशावरील विदेशी कर्जात गेल्या 10 वर्षांत 265 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी वाढ झाल्याचे सीतारामन म्हणाल्या. विदेशी कर्जाच्या व्याजाचा आकडा 27.10 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.