छत्तीसगडमध्ये पुन्हा चकमक, बिजापूरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत तीन नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमधील चकमक सुरूच आहे. बिजापूर जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना मद्दीद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात गोळीबार झाला. या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि जिल्हा दलाचे कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई केली.