
हिंदुस्थानच्या बाजारपेठेतील घसरणीकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे असून सामान्य लोक त्यांचे पैसे गमावत असल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगताना अर्थव्यवस्था कोलमडण्यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले. अमेरिकेने शुल्क लादण्याची घोषणा केल्यानंतर शेअर बाजार कोसळला. सामान्यांचे प्रचंड नुकसान होत आहे, शेअर बाजारात सर्वसामान्यांचा पैसा बुडाला तर बाजार आणि अर्थव्यवस्था दोन्हीही बुडतात, अशा शब्दांत अखिलेश यांनी ‘एक्स’ पोस्टमधून केंद्रावर हल्ला चढवला.