
ढाकाहून दुबईला चाललेल्या बांग्लादेश एअरलाईन्सच्या विमानाचे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात 175 प्रवासी होते. सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची सूचना मिळताच विमानाला नागपूरमधील बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरण्यात आले. विमानातील सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने दुबईला रवाना करण्यात आले.