
पाच वर्षाच्या मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याचा आरोप करत इंडिगोच्या महिला क्रू मेंबरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. प्रियांका मुखर्जी नामक महिला प्रवाशाने फ्लाइट अटेंडंट आदिती अश्विनी शर्मा विरोधात तक्रार दाखल केली होती.
इंडिगोचे विमान 1 एप्रिल रोजी त्रिवेंद्रमहून बेंगळुरूला चालले होते. प्रियांका मुखर्जी ही महिला आपल्या दोन मुलींसह या विमानातून प्रवास करत होती. विमान हवेत असताना प्रियांका यांची 5 वर्षांची मुलगी रडत होती. यामुळे त्यांनी मुलीला क्रू मेंबरकडे सोपवले. क्रू मेंबर मुलीला घेऊन गेली आणि परत आली तेव्हा मुलीच्या गळ्यात सोनसाखळी नव्हती, असा दावा मुखर्जी यांनी केला आहे.
मुखर्जी यांनी केम्पेगौडा विमानतळ पोलीस ठाण्या तक्रार दाखल केली. पोलिसांनी कथित चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.