सर्व्हिस रायफल साफ करताना चुकून गोळी सुटली आणि छातीत घुसली. या अपघातात कॉन्स्टेबलचा दुर्दैवी मृत्यू झाला. आसामच्या दिब्रुगड जिल्ह्यात ही घटना घडली. माधब चुटिया असे मयत कॉन्स्टेबलचे नाव आहे.
माधब दिब्रुगडमधील अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे पीएसओ म्हणून कार्यरत होता. रविवारी तो आपली सर्व्हिस AK-74 रायफल साफ करत असताना चुकून ट्रिगर दाबला गेला आणि गोळी सुटली. ही गोळी माधबच्या छातीत घुसली.
माधबला तात्काळ आसाम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.