महाकुंभ मेळाव्याहून घरी परतत असताना कार डंपरला धडकल्याने भीषण अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात लष्करी अधिकाऱ्यासह त्यांच्या मुलीचा आणि शेजाऱ्याचा मृत्यू झाला. तर अधिकाऱ्याच्या पत्नीसह एक महिला गंभीर जखमी झाली आहे. शिवजी सिंह, सोनम सिंह आणि राजीव कुमार अशी मयतांची नावे आहेत. तर नीरा देवी आणि अलका सिंह अशी जखमींची नावे आहेत.
शिवजी सिंह हे सध्या लेह येथे कर्तव्यावर होते. सध्या ते सुट्टीवर आले होते. सुट्टी असल्याने त्यांनी कुंभ स्नानाला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे ते पत्नी, मुलगी आणि शेजरील जोडपे यांच्यासह कुंभस्नानासाठी गेले. तेथून परतत असताना उत्तर प्रदेशातील प्रयागराज-वाराणसी महामार्गावरील मुर्जामुराद येथे त्यांची कार डंपरला धडकली.
अपघात शिवजी सिंह यांच्या त्यांची मुलगी सोनम आणि शेजारी राजीव कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. तर सिंह यांची पत्नी नीरा देवी आणि शेजारीण अलका सिंह या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.