टोल वाचवण्यासाठी बस चालकाने टोल कर्मचाऱ्याला धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्मचाऱ्याला धडक बस चालक तेथून पळून गेला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हरियाणातील गुरुग्राम टोल प्लाजावर ही घटना घडली. या घटनेत टोल कर्मचारी जखमी झाला आहे.
जखमी कर्मचाऱ्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुग्राम पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस बस चालकाचा शोध घेत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली असून टोल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.