राजधानी दिल्लीसह इतर राज्यातही शाळेत बॉम्ब असल्याच्या किंवा शाळा बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून असे कॉल आणि ईमेल येत होते. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क होती. हे ईमेल आणि कॉल प्रगत तंत्रज्ञानाने पाठवण्यात येत असल्याने पोलिसांना आरोपींचा सुगावा लागत नव्हता. आता दिल्ली पोलिसांना याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
दिल्लीतील 400 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात एका मुलाला अटके केली आहे. त्याच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या मुलाचे कुटुंब एका एनजीओच्या संपर्कात होते. या एनजीओचे दहशतवादी अफझल गुरुशी संबंध होते. त्यामुळे याघटनेमागे दहशतवादी कनेक्शन आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
या मुलाचे वडील दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीविरोधात आवाज उठवणाऱ्या एनजीओशी संबंधित होते. दिल्लीतील शाळांमध्ये अनेक दिवसांपासून बॉम्ब ठेवल्याचे बनावट कॉल/मेल येत होते. गेल्या वर्षी 12 फेब्रुवारीपासून अशाप्रकारचे अनेक कॉल आणि मेल्सला सुरुवात झाली. हे मेल अतिशय प्रगत पद्धतीने पाठवले जात होते, त्यामुळे आरोपींना शोधण्यात पोलिसांना वेळ लागला. मात्र, 8 जानेवारी 2025 ला शेवटचा कॉल आला, त्यानंतर आता पोलिसांनी एका मुलाला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.