Varanasi Incident – वाराणसीत मान मंदिर घाटाजवळ बोट उलटली, एनडीआरएफडून बचावकार्य सुरू

महाकुंभमधील आग, चेंगराचेंगरी प्रकरणानंतर आता वाराणसीत प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडाली. बोटीत एकूण 60 प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मान मंदिर घाटाजवळ ही दुर्घटना घडली.

बोट अनियंत्रित झाल्याने अचानक पाण्यात बुडाली. यावेळी घाटावर उपस्थित असलेल्या लोकांनी आरडाओरडा सुरु केला. यानंतर एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य सुरू आहे.