लोकसभा निवडणुकीनंतर भाजप आणि एनडीएला धक्का; 7 राज्यातील पोटनिवडणुकीत पराभव

लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजप आणि एनडीएला नाकारल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. आता लोकसभा निवडणुकीनंतर सात राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेने भाजप आणि एनडीएला चांगलीच धोबीपछाड दिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही तर आता सात राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत 13 जागांपैकी भाजपला फक्त 2 जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएदेखील या निवडणुकीत प्रभाव दाखवू शकली नाही. लोकसभेनंतर आता पोटनिवडणुकीतही भाजपची पीछेहाट झाल्याने जनतेने भाजप आणि एनडीएला नाकारल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.

या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने जबरदस्त कामगिरी केली आहे. या 13 जागापैकी 8 जागेवर काँग्रेसने उमेदवार उतरवले होते. त्यातील 5 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. तर पश्चिम बंगालमधील चारही जागांवर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. पंजाबमध्येही आपने विजय मिळवला आहे. तर बिहारमध्ये अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांनी आरजेडीच्या बीमा भारती आणि जेडीयूच्या कलाधर मंडल यांचा पराभव केला आहे.

या पोटनिवडणुकीतही जनतेने भाजप आणि एनडीएला नाकरल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच अनेक राज्यातही जनमत भाजप आणि एनडीएविरोधात असल्याचे स्पष्य दिसत आहे. या निकालामुळे भाजप आणि एनडीएची चिंता वाढली आहे.