अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी व्यक्त केली निवृत्तीची इच्छा; जाणून घ्या कारण…

उत्तर प्रदेशातील अयोध्यात राम मंदिराचे उद्घाटन होत ते सर्वांसाठी खुले झाल्यानंतर मंदिरात भाविकांची संख्या प्रचंड वाढत आहे. मंदिरात देश-परदेशातून भाविक येत आहेत. या राम मंदिरात मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास आहेत. ते आता 87 वर्षांचे झाले आहे. ते 34 वर्षांपासून राम मंदिरात मुख्य पुजारी आहे. आता त्यांनी निवत्तीची इच्छा व्यक्त केली आहे.

मंदिर ट्रस्टकडे याबाबतची इच्छा सत्येंद्र दास यांनी व्यक्त केली. वयोमानामुळे मंदिराशी संबंधित कामातून निवृत्ती घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. ट्रस्टच्या झालेल्या बैठकीत त्यांना आजीवन वेतन देण्याबाबत चर्चा झाली. बैठकीतील सर्वच सदस्यांनी त्याला संमती दिली. तसेच सत्येंद्र दास जेव्हा पाहिजे तेव्हा मंदिरात येऊ शकतात आणि पूजाही करु शकतात. त्यांना आता आजीवन वेतन मिळणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

रामजन्मभूमीत 1 मार्च 1992 पासून आचार्य सत्येंद्र दास मुख्य अर्चक म्हणून सेवा देत आहे. सुरुवातीला त्यांचे वेतन खूपच कमी होते. त्यांना महिन्याला केवळ शंभर रुपये वेतन मिळत होते. आता सत्येंद्र दास यांना 38 हजार 500 रुपये महिन्याला वेतन मिळत आहे. रामललाची मूर्ती टेंटमध्ये विराजमान असतानापासून आचार्य सत्येंद्र दास पुजारी म्हणून भगवतांची पूजा-अर्चना करत आहेत. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवरी 2024 रोजी झाली होती. त्यावेळीही सत्येंद्र दासच राम मंदिराचे मुख्य पुजारी होते.

राम मंदिरात आचार्य सत्येंद्र दास मुख्य पुजारी आहेत. त्यांच्यासह अन्य 13 पुजारी मंदिरात सेवा देत आहे. नुकतेच नऊ नवीन पुजाऱ्यांची नियुक्ती मंदिरात करण्यात आली. सत्येंद्र दास यांनी सांगितले की, ट्रस्टचे सदस्य मला भेटले. आरोग्य आणि वाढत्या वयामुळे राम मंदिराच्या कामातून निवृत्ती घेण्याची इच्छा आपण व्यक्त केली. त्यांना आजीवन वेतन देण्याच्या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी मंडुरी दिली आहे. आचार्य सत्येंद्र दास यांची गणना संस्कृतच्या प्रकांड विद्वानांमध्ये होते. त्यांनी 1975 मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्याची पदवी घेतली होती. 1976 मध्ये अयोध्यातील संस्कृत महाविद्यालय ते प्राध्यापक झाले होते.