बिहारमध्ये या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. यावेळी प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष निवडणुकीच्या मैदानात असणार आहे. 243 बिहार विधानसभेच्या जागांपैकी 70 उमेदवार अत्यंत मागासवर्गीय उभे करणार असल्याचे आश्वासन प्रशांत किशोर यांनी आज दिले. ते बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. लोकसंख्येनुसार राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित केले पाहिजे, असा जनसुराज पक्षाचा विश्वास आहे. म्हणून आम्ही अत्यंत मागासवर्गीयांना विधानसभेसाठी संधी देऊ, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.