प्रश्नपत्रिका वाचनासाठी 15 मिनिटांचा वाढीव वेळ

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) बोर्डाची दहावी, बारावीची परीक्षा एप्रिल-मे महिन्यात होणार असून यंदा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचनासाठी 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारण्यासाठी बोर्डाने परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत.

विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी 2ः15 ते 2ः30 पर्यंत अतिरिक्त 15 मिनिटे प्रश्नपत्रिका वाचनासाठी वेळ दिली जाईल. वाचनासाठी दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांना कोणतीही उत्तरे लिहिता येणार नाहीत. प्रश्नपत्रिका वाचून समजून घेण्यासाठी हा वेळ देण्यात आल्याचे बोर्डाने स्पष्ट केले. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे व परीक्षेचा ताण कमी करून विद्यार्थ्यांची कामगिरी वाढविण्यासाठी हातभार लावणे हा या मागील उद्देश असल्याचे एनआयओएस बोर्डाने स्पष्ट केले.