मतदान होताच सरकारचा जनतेला धक्का, राष्ट्रीय महामार्गावरील टोल वाढवला

देशात लोकसभा निवडणूकीच्या मतदानाचे सर्व टप्पे पार पडताच केंद्र सरकारने जनतेला जोरदार धक्का दिला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 2 जूनच्या मध्यरात्रीपासून देशातील सर्व महामार्गावरील टोल दरात पाच टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता नागरिकांचा रस्ते प्रवास देखील महागणार आहे. त्यामुळे देशभरातील तब्बल 1100 टोल प्लाझावर ही टोलवाढ लागू होणार आहे.

निवडणूक आयोगाने थांबवलेली टोलवाढ

ही टोल वाढ दरवर्षीच्या प्रक्रीयेचा भाग आहे. दरवाढ आधीच होणार होती. मात्र निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या काळात दरवाढ न करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे दरवाढ रोखण्यात आली होती.

दूधाचे दरही वाढले

अमूल कंपनीने त्यांच्या दुधाच्या दरात लीटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना ‘अमुल गोल्ड’च्या अर्धा लीटरच्या पिशवीसाठी 32 रुपयां ऐवजी 33 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच ग्राहकांना अमूल गोल्डच्या एक लीटरच्या पिशवीसाठी आता 64 ऐवजी 66 रुपये द्यावे लागणार आहेत.