नॅशनल हेराल्डला ईडीची नोटीस

तब्बल 661 कोटींची स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीने नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्र व असोसिएट जनरल लिमिटेड कंपनीच्या दिल्ली, मुंबई, लखनऊ येथील कार्यालयांना नोटीस बजावली आहे. या कार्यालयांवर ही नोटीस चिटकवण्यात आली आहे. मुंबईतील जागा रिकामी करा अथवा त्याचे भाडे आम्हाला द्या, असे ईडीने नोटीसमध्ये नमूद केले आहे. कंपनीने कोटय़वधी रुपयांच्या बनावट देणग्या, भाडे व जाहिराती घेतल्याचा ईडीचा आरोप आहे.