
हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू आहे. त्यात देशाचा विकासाचा त्यात मागमूस नाही, अशा शब्दांत तामिळनाडूचे मुखअयमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाला विरोध केला. तसेच दक्षिणेकडील राज्यांवर सक्तीने हिंदी लादण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उद्देश देशाच नव्हे तर हिंदीचा विकास करणे हा आहे, असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर हल्लाबोल केला.
तामिळनाडू आणि केंद्र यांच्यातील भाषिक वाद वाढत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या नावाखाली भाजप दक्षिणेकडील राज्यावर ‘हिंदी लादण्याचा’ प्रयत्न करत आहे, असा आरोप स्टॅलिन यांनी केला. देशाऐवजी ही हिंदीचा विकास करण्याची योजना आहे, असे ते म्हणाले. तिरुवल्लूरमधील एका कार्यक्रमात बुधवारी स्टॅलिन यांनी NEP वर हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा विकास करण्यात अयशस्वी ठरले, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही या धोरणाचा विरोध करत आहोत कारण ते तामिळनाडूच्या शिक्षण व्यवस्थेला पूर्णपणे नष्ट करणार आहे. केंद्राने त्यांचे शिक्षण धोरण लागू होईपर्यंत राज्य चालवल्या जाणाऱ्या शाळांसाठी 2,150 कोटी रुपयांचा निधी नाकारणे हा देशाच्या संघराज्यीय रचनेवर हल्ला आहे. केंद्र राज्यांचे आणि संघराज्यीय रचनेचे अधिकार नष्ट करण्यासाठी हुकूमशाहीसारखे वागत आहे, असा आरोप त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर केला.
तामिळनाडूतील निवडणुकीतील पराभवासाठी भाजप राजकीय सूड घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आम्ही आमच्या करांचा वाटा मागत आहोत. या धोरणासाठी 43 लाख शाळांचा निधी अडवणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. राज्याची शैक्षणिक घडी बिघडवणारे आणि सक्तीने हिंदी लादणारे हे धोरण आहे. त्यामुळे त्याला आमचा ठाम विरोध असल्याचेही स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.