
नुकतेच भाईंदर रेल्वेस्टेशनवर वडिल -मुलाच्या आत्महत्येनंतर मुंबई हादरली असताना आता नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगातील सर्वांधिक आत्महत्या हिंदुस्थानात झाल्या आहेत . एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार, 2022 मध्ये हिंदुस्थानात 1.71 लाख लोकांचा आत्महत्या केल्या. हिंदुस्थानातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक संख्या आहे.
याबाबत आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आत्महत्येमागील महत्वाचे कारण नैराश्य आहे. हा एक मानसिक आजार असून आत्महत्येमागे तणाव हे कारण असू शकते. याबाबत नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील सायकॅट्री अॅण्ड बिहेविअरल सायन्सचे उपाध्यक्ष राजीव मेहता यांनी दिली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तणावामागील महत्वाचे कारण नोकरी, पैसे, नात्यांमधील तणाव आणि आरोग्य ही महत्वाची कारणे आहेत. या कारणांमुळे आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांमुळे तणाव निर्माण होतो आणि तो तणाव टोकाला पोहोचला की नैराश्य येते आणि त्यातून आत्महत्येसारख्या घटना घडतात. आत्महत्या केलेल्या लोकांपैकी 50 ते 90 टक्के लोकं नैराश्य, चिंता आणि आजार असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे.
आत्महत्या हे हिंदुस्थानासमोरील सर्वात मोठे सार्वजनिक आरोग्य संकट आहे. तरुणांमधील आत्महत्येमागील महत्वाचे कारण आहे. अत्यंत तणावाच्या काळात आत्महत्या आवेगाने होऊ शकतात.