
मोक्ष मिळवण्याच्या बहाण्याने टेकडीवर नेत फ्रेंच पर्यटक महिलेवर अत्याचार केल्याची घटना तामिळनाडूमध्ये घडली. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपी टुरिस्ट गाईडला पोलिसांनी अटक केली आहे. व्यंकटेश असे आरोपीचे नाव आहे.
फ्रान्समधील 46 वर्षीय महिला जानेवारी 2025 मध्ये तामिळनाडूमधील तिरुवन्नमलाई येथे आली. एका खाजगी आश्रमात ती राहत होती. मोक्ष मिळवण्याच्या बहाण्याने ध्यान धारणा करण्यासाठी व्यंकटेश महिलेला दीपमलाई टेकडीवर जाण्यास बंदी असतानाही तेथे घेऊन गेला. तेथील गुहेत ध्यान करण्यासाठी शिरताच व्यंकटेशने तिच्यावर बलात्कार केला.
महिलेने कशीबशी स्वतःची सुटका करत तेथून पळ काढला आणि पोलीस ठाणे गाठले. महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी व्यंकटेशविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यानंतर व्यंकटेशचा कसून शोध घेत त्याला अटक करण्यात आली. पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.