केंद्राच्या ओबीसी यादीत महाराष्ट्रातील आणखी 15 जाती, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची मान्यता

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील 15 जातींचा समावेश इतर मागासवर्गीय अर्थात ‘ओबीसी’ मध्ये करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील काही जातींचा केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये नव्याने समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारकडून करण्यात आली होती. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने त्यास मान्यता देऊन यासंदर्भातील यादी केंद्रीय मंत्रिमंडळापुढे सादर केली आहे.

n बडगुजर, सूर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, पोवार  भोयर पवार, कापेवार, मुन्नर कापेवार, मुन्नर कापू, तेलंगा, तेलंगी, पेंटारेड्डी, बुकेकरा, लोध लोधा लोधी आणि डांगरी अशा या 15 जाती आहेत.

मराठा समाजाचं काय?

मराठा समाजाला ओबीसी कोटय़ातून आरक्षण मिळावे, अशी मागणी केली जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे या मागणीसाठी दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहेत. मात्र सरकारकडून त्यावर केवळ आश्वासने दिली जात आहेत.