
निफाड आणि चांदवड तालुक्याला रविवारी अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. येवला तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झाली. द्राक्ष, कांदा व गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. येवल्यात शनिवारी शहर, तसेच ग्रामीण भागात सुकी, नांदुर येथे सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली.
रविवारी दुसऱ्या दिवशीही पूर्व भागातील राजापूर, ममदापूर, रहाडी, भारम, कोळम येथे गारपीट झाली. चांदवड तालुक्यातील खडकजांब परिसरालाही मुसळधार पावसाने झोडपले. निफाड तालुक्यात रविवारी दुपारी पिंपळगाव बसवंत परिसरात विजांचा कडकडाट झाला, यामुळे शेतकऱयांची कांद्यासह शेतीमाल झाकण्यासाठी धावपळ उडाली.