![ED](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/ED-696x447.jpg)
जिल्ह्यासह नाशिकमधील मेसर्स राजमल लखीचंद ज्केलर्स प्रा. लि. कडील सुमारे 169 कोटी रुपये किमतीच्या असंख्य स्थाकर मालमत्ता ईडीने तात्पुरत्या स्करूपात जप्त केल्या आहेत. ईडीच्या या कारवाईने दोन्ही जिह्यांत खळबळ उडाली आहे. स्टेट बँकेच्या फसवणुकीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
आर. एल. ग्रुपच्या कंपन्या आणि त्यांचे संचालक, प्रवर्तक गुन्हेगारी कट, फसवणूक, बनावटगिरी आणि गुन्हेगारी गैरवर्तनाच्या गुन्हय़ांमध्ये सहभागी होते. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जाणूनबुजून कर्ज घेतली आणि ती कर्ज बुडवली होती. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाला 352.49 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.