
शाळेच्या दप्तरामध्ये वह्या, पुस्तके, पेन, कंपास या वस्तू असतात. मात्र, इगतपुरी ताल्याक्यातील घोटीच्या खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात कंडोम, अंमली पदार्थ, फायटर, चाकू, सायकलची चेन आणि पत्त्याचे कॅट आढळून आल्याने शिक्षकांसह सर्वच हादरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना इगतपुरी तालुक्याच्या घोटी येथील एका खासगी शाळेतील असल्याचे उघड झाले आहे. अशोभनीय हेअरस्टाईल केल्यामुळे शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांना दणका देत शाळेतच त्यांचे केस कापले. त्यांची हिरोगीरी बंद करण्यासाठी शिक्षकांना हे पाऊल उचलावे लागले. त्यानंतर शिक्षकांनी अचानक विद्यार्थ्यांची दप्तरे तपासायला सुरुवात केली. दप्तरं तपासले असता दप्तरामध्ये कंडोम, अंमली पदार्थ, फायटर, चाकू, सायकलची चेन आणि पत्त्याचे कॅट आढळून आले. विद्यार्थ्यांची दप्तरं पाहून शिक्षकही अचंबित झाले. त्यांनी तत्काळ विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून घेतले आणि सदर प्रकाराची माहिती दिली. त्याचबरोबर आई-वडिलांच्या समोर विद्यार्थ्यांना समज देण्यात आली. या प्रकारामुळे विद्यार्थी नेमके कोणत्या मार्गावर चालले आहेत? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.
इयत्ता आठवी आणि नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात वही आणि पुस्तकं सापडण्याऐवजी चक्क कंडोम, फायटर, चाकू, सायकलची चेन, लोखंडी कडे आणि अंमली पदार्थ आढळले आहेत. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील घोटीमध्ये असणाऱ्या एका खासगी शाळेत हे विद्यार्थी शिकत आहेत.#nashik #students pic.twitter.com/zwSAmhxIlw
— Saamana Online (@SaamanaOnline) April 8, 2025