नाशिक जिह्यात ‘ईव्हीएम’ची जादू; महायुतीची ‘जैसे थे’ स्थिती!

नाशिक जिह्यात महायुतीचे सर्वच्या सर्व पंधरा उमेदवार विजयी झाले. आपण पराभूत झालो, अशी ज्यांची मानसिकता होती, त्यांनाही विजयाने आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही महायुतीची नाही तर ‘ईव्हीएम’ची जादू असल्याचे बोलले जात आहे.

वंचितच्या शिंदेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

वंचितचे अविनाश शिंदे हे देवळाली मतदारसंघात उमेदवार होते. त्यांना अवघी 11 हजार 831 मते मिळाली, ते पराभूत झाले. त्यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट चर्चेचा विषय आहे. माझ्या घरातील 65 मतदान, पदाधिकाऱ्यांचे साडेतीनशेहून अधिक मतदान असताना माझ्या गावात मला फक्त चारच मते मिळाली. हा ‘ईव्हीएम’ने केलेला घात आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.