Video – पाहा नाशिकमधील बोरचिवारी गावातील पाणीटंचाईचे भीषण चित्र

यावर्षी मार्च महिन्यापासूनच महाराष्ट्रातील अनेक गावागावांमध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. काही गावांना आठ आठ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. गावांमधील विहीरिंमधील पाणीही तळाला लागले आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी जीवावर बेतून विहिरीत उतरावं लागत आहे. नाशिकमधील पेठ तालुक्यातील बोरचिवारी गावातील असाच एक व्हिडीओ ANI या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.