सुनीता विल्यम्सचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग अखेर मोकळा, नासाची हॉट एअर चाचणी यशस्वी

अंतराळात सुनीता विल्यम्स आणि बच विल्मोर हे नासाचे अंतराळवीर अडकले आहेत. त्या दोघांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहचवणाऱ्या बोईंग स्टारलायनर यानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुले तब्बल 52 दिवस उलटूनही दोघे अंतराळवीर पृथ्वीवर परतू शकलेले नाहीत. अशातच आता त्यांच्या परतण्याबाबत आशेचा किरण दिसू लागलाय. कारण नासाने जारी केलेल्या निवेदनानुसार, 27 जुलै रोजी नासाने स्टारलायनर स्पेसक्राफ्ट रिअॅक्शन कंट्रोल सिस्टमचे हॉट फायर टेस्ट पूर्ण केलेय. सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर या चाचणीच्या वेळी स्पेसक्राफ्टमध्ये उपलब्ध होते. ही चाचणी यशस्वी झाल्याचे नासाने सांगितलेय. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून बोईंग स्टारलायनर पृथ्वीवर आणण्याच्या दृष्टीने ही चाचणी महत्त्वपूर्ण  होती. ही चाचणी यशस्वी झाली असून दोघे अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर परतू शकतील अशी आशा निर्माण झालीय.